जेव्हा मुलीच्या पोटात आढळून आले तब्बल 190 मॅग्नेटिक बॉल, डॉक्टर झाले ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये एका मुलीची तब्येत बिघडल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या पाच वर्षांच्या मुलीच्या पोटातून 190 मॅग्नेटिक बॉल (मोत्याच्या आकाराचे) काढले, जे तिने खेळताना गिळले होते. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर आई-वडील तिला घेऊन हॉस्पीटलमध्ये पोहचले. डॉक्टरांनी जेव्हा एक्स-रे काढला तेव्हा मुलीच्या पोटात असंख्य मॅग्नेटिक बॉल आढळले. सुमारे दोन महिन्यापासून मुलीच्या पोटात ते अडकले होते.

आईने डॉक्टरांना सांगितले की, जेव्हा दोन महिन्यांपूर्वी ती खेळण्याशी खेळत होती त्यावेळी तिने जवळपास 50 चुंबकीय मोती गिळले होते, ज्यास बकीबॉल सुद्धा म्हणतात. असे होऊनही आई-वडीलांनी जास्त लक्ष दिले नाही आणि विचार केला की, हॉस्पीटलमधून रिपोर्ट मिळाल्यानंतर हे छोटे बॉल बाहेर काढता येतील. त्या छोट्या मुलीला बकीबॉल गिळताना कोणताही त्रास झाला नव्हता. हॉस्पीटलने सांगितले मुलीला शेवटी जिनान हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.

यानंतर मुलीच्या आईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकत अन्य पालकांना या खेळण्याच्या माळेतील मणी मुले गिळण्याचा धोका सांगितला आणि सावध केले. चीनच्या डॉक्टरांनी एका एमर्जन्सी ऑपरेशन्स नंतर मुलीच्या पोटातून चुंबकीय बॉल बाहेर काढले. ऑपरेशनच्या दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात दिसत आहेत की, कशा प्रकारे सर्जनने पोटातून मॅग्नेटिक बॉल बाहेर काढले.