धक्कादायक ! PUBG खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं तरूणाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात पबजी (PUBG) गेम खेळताना ह्दयविकाराचा झटका आल्यानं तरुणाचा मृत्यू झाला.

हर्षल देविदास मेमाणे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. शुक्रवारी हर्षल पबजी गेम खेळत असताना त्याला ह्दयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. उपस्थितांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. आज शनिवारी उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावेत परिसरात राहणाऱ्या हर्षलचा पबजी गेम खेळत असताना तणावातून मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी हर्षल हा नेहमीप्रमाणे घरात पबजी गेम खेळत होता. अचानक त्याला झटका आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबातील व्यक्तींनी तातडीने हर्षलला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटेच्या सुमारादरम्यान त्याचा उपचारसुरू असताना मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/