धक्कादायक ! पुण्यात ‘कॅट ब्रिडींग’च्या व्यवसायिक स्पर्धेततून तरुणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कात्रज चौकात मांजर ब्रिडींग व्यवसायाच्या स्पर्धेतून तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी यासीन नदाफ ( वय २६,रा.कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मांजर (कॅट ब्रिडींग) चा व्यवसाय आहे. या व्यवसायीक स्पर्धेतून राग मनात धरुन फिर्यादी यांच्या मित्रास व्हॉटसअप कॉल करुन आरोपींनी कात्रज चौकात बोलविले. त्यामुळे फिर्यादी हे मित्रासोबत त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी मागे बसलेल्या एकाने लोखंडी धारदार वस्तूने फिर्यादी यांच्यावर वार केले. यानंतर ते दोघेही दुचाकीवरुन पळून गेले. अधिक तपास उपनिरीक्षक महेंद्र पाटील हे करत आहेत.