Video : भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर बूट भिरकावला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांच्यावर पत्रकार परिषदेत बूट भिरकावण्यात आल्याची घटना घडली आहे.. शक्ती भार्गव असे बूट भिरकावणाऱ्याचे नाव असून तो व्यवसायाने डॉक्टर आहे. सरकारी मिलमध्ये ११ कामगारांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने संतापल्याने आरोपीने हा बूट फेकून मारल्याचे समोर येत आहे. भर पत्रकार परिषदेत अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

नवी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरु होती. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांच्यावर बूट भिरकावण्यात आला. त्यानंतर आरोपीने मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि बाहेर काढले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like