‘त्या’ रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अधीक्षक अभियंत्यांच्या टेबलावर ठेवला बुटांचा हार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीगेट-निलक्रांती चौक रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या टेबलावर बुटांचा हार ठेवून बांधकाम विभागाचा निषेध केला.

नगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्ता अत्यंत खराब झाला आहे. नगरकरांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत. या अगोदरही आमदार संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाला पत्र देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही या रोडचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आज आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आ. संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या निषेधार्थ बुटांचा हार घेऊन अधीक्षक अभियंता यांच्या टेबलावर ठेवला होता. उद्या सकाळी काम चालू करण्याचे लेखी पत्र घेऊन संग्राम जगताप यांनी आपले आंदोलन थांबविले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके