धक्‍कादायक ! आरोपीने न्यायाधीशांना चप्पल फेकून मारली

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुनावणीच्या वेळी न्यायालयात न्यायाधिशांना चप्पल फेकून मारल्याची खळबळजनक घटना ठाणे न्यायालयात घडली आहे. आरोपीने फेकून मारलेली चप्पल न्यायाधिशांच्या उजव्या खांद्याला लागली असून आरोपीने न्यायाधिशांना शिवीगाळ केली.

आरोपी विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. गणेश गायकवाड याला शुक्रवारी ठाणे न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी न्यायाधिशांनी गायकवाडला तुझे वकिल आले नाहीत का अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने तुम्हीच मला वकिल दिला आहे ते कधी तारखेला येत नाहीत असे उद्धट उत्तर दिले.

त्यावर न्यायाधिशांनी तुला दुसरे वकिल देतो, पुढील तारखेला केस चालवू असे सांगितले. संतापलेल्या गणेश गायकवाड याने पायातील चप्पल काढून न्यायाधिशांना फेकून मारली. तसेच मोठ मोठ्या आवाजात न्यायाधिशांना शिवीगाळ केली.

या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली. पोलिसांनी गणेश गायकवाड विरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयातील शिपायाने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

अल्पसंख्याकावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला – हाफिज अ.गफार

You might also like