अहमदनगर : पाणी योजनेसाठी ‘शोले’ स्टाईल (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सोनई-करजगाव पाणीे योजना सुरू करण्यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट ‘जीवन प्राधिकरणा’च्या इमारतीवर चढून घोषणाबाजी सुरू केली आहे. तात्काळ योजना मंजूर करा अन्यथा इमारतीवरून खाली उड्या मारण्याचा इशारा आंदोलकांकडून दिला जात आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

सोनई-करजगाव व १६ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना प्रलंबित आहे. ही योजना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी सोनई व परिसरातील ग्रामस्थांनी आजपासून तारकपूर येथील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या इमारतीवर चढले. तेथून आंदोलकांकडून ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही उडी टाकून आत्महत्या करू’, अशी धमकी दिली जात होती.
आंदोलकांची इमारतीवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. आंदोलकांनी पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास वरून खालू उड्या टाकण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. यावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त