‘गुलाबो सिताबो’ मध्ये आयुष्यमान खुराणा सोबत अमिताभ बच्चन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘पीकू’, ‘मद्रास कैफे’ आणि ‘विक्की डोनर’ सारखे हिट झालेले चित्रपट बनवणारे दिग्दर्शक शूजित सरकार आता नवीन एक प्रकल्प घेऊन येत आहे. चित्रपटासाठी शूजित सरकारने आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांनी साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘गुलाबो सिताबो’ आहे.

हा चित्रपट कॉमेडी असणार आहे आणि पहिल्यांदाच आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन सोबत पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाची कथा जूही चतुर्वेदीनी लिहिली आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये या चित्रपटाची शूटिंग चालू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी लहरी आणि शिल कुमार प्रोडक्शन्स करणार आहे.

एका वृत्तसंस्थेत बोलत असतांना शूजित सरकार बोलले मी आणि जूही काही दिवसांपासून चित्रपटाचा पटकथेवर काम करत होतो. जशी मी पटकथा वाचली तेंव्हाच माझ्या डोक्यात मिस्टर बच्चन आणि आयुष्मान खुराना आले. सगळे जण या चित्रपटात काम करण्यासाठी उत्साही आहेत तर त्यामुळे यावर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मार्गावर आहेत.

असे समजले जाते की चित्रपट नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त शुजित सरकार आपल्या ‘शहीद उधम सिंग’ चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात विक्की कौशल मुख्य अभिनेता आहे. व आयुष्मान खुराना आणखी काही दिवसांपासून ‘बाला’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. व दुसरीकडे अमिताभ बच्चन ‘चेहरा’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like