‘या’ नियम आणि अटींसोबत लवकरच सुरू होऊ शकते सिनेमांची शुटींग, CM ठाकरेंनी दिले संकेत !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनमध्ये सारं काही ठप्प आहे. सिनेमा आणि मालिकांची शुटींगही बंद आहे. अशात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे संकेत दिले आहेत की, काही अटी आणि शर्थींसोबत सिनेमांची शुटींग सुरू केली जाऊ शकते. फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बाब आहे.

फिल्म इंडस्ट्रीनं घेतली सीएम ठाकरेंसोबत बैठक

कालच (बुधवार दि 20 मे) सीएम ठाकरे आणि इंडिस्ट्रीतील काही लोकांची बैठक झाली. यात त्यांनी सोशल डिस्टेंसिंग पालन केल्यास शुटींगसाठी परवानगी दिली जाऊ शकते असे संकेत दिले. बुधवारी ठाकरेंनी निर्मात्यांना सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टेंस ठेवत, नियमांचं पालन करत मर्यादित कार्यबल ठेवत शुटींगसाठी योजना तयार करा. यासाठीच्या परवानगीवर ते विचार करतील असंही ते म्हणाले. ठाकरेंनी सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सिनेमा हॉल आणि सिनेमांची शुटींग आता नेमकी कधी सुरू हेईल हे आता लवकरच समजेल. परंतु ही बातमी ऐकल्यानंतर फिल्मच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही.