Pimpri News : जुन्या सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार, प्रचंड खळबळ

पिंपरी (Pimpri) : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणावर अज्ञात इसमाने गोळी झाडली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर जुनी सांगवी येथे घडली. आनंद ललित कुमार सोलंकी (वय-30 रा. स्पायसर कॉलेज रोड, जुनी सांगवी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आनंद हे मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, अज्ञात इसमाने पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्यांच्या कानाला लागली असून त्यांना उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी आनंद हे त्यांची पत्नी आणि एका तीन वर्षाच्या मुलीला घेऊन रस्त्याने पायी चालत जात होते. शितोळे पेट्रोल पंप परिसरात एका अनोळखी व्यक्तीने पाठिमागून गोळी झाडली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.