Shooting World Cup | मराठमोळ्या राही सरनोबतचा ऐतिहासिक ‘नशाणा’, शूटिंग वर्ल्ड कपमध्ये 25 मीटर पिस्तुल प्रकारात ‘सुवर्ण’पदक

क्रोएशिया : वृत्तसंस्था –  टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीच (Tokyo Olympic) भारतासाठी (India) चांगली बातमी समोर आली आहे. क्रोएशिया मध्ये सुरू असलेल्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Shooting World Cup) मराठमोळ्या राही सरनोबतला (Rahi Sarnobat) सुवर्ण पदक (Gold Medal) मिळालं आहे. राही सरनोबत (Rahi Sarnobat) कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur district) आहे. राहीने 25 मीटर स्पोट्रर्स पिस्टल (25 meters pistol) प्रकारात सुवर्ण कामगिरी (Golden performance) केली आहे. राहीचं या वर्ल्ड कपमधील (World Cup) हे दुसरं मेडल (Medal) आहे. याआधी तिने 10 मीटर एयरपिस्टल (10m air pistol) प्रकारात महिला टीम इव्हेंटमध्ये (Team event) कांस्य पदक (Bronze medal) जिंकलं होतं. यंदाच्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Shooting World Cup) भारताचे हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. Shooting World Cup | issf world cup rahi sarnobat grabs gold medal in 25 meters pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

राहीची दमदार कामगिरी

30 वर्षाच्या राही सरनोबतने (Rahi Sarnobat) 591 गुण मिळवत 25 मीटर पिस्तूल (25 meters pistol) प्रकारात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले.
तिचा फायनलमधील स्कोअर (Final score) 39 होता.
या प्रकारात रौप्यपदक (Silver medal) फ्रान्सच्या (France) मथिल्डे लामोलेने (Mathilde Lamole) जिंकले. तिचा फायनल स्कोअर 31 होता.
राहीने फायनल बरोबरच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या फेरीतही दमदार कामगिरी केली.

 

क्वालिफायिंग राऊंडमध्ये राही दुसरी

शूटिंग वर्ल्ड कपमध्ये (Shooting World Cup) भारताला आतापर्यंत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक मिळाली आहेत. पदकांच्या स्पर्धेत भारत India सहाव्या क्रमांकावर आहे.
रशिया (Russia) 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
25 मीटर स्पोटर्स पिस्टल क्लालिफायिंग राऊंडमध्ये (qualifying round) राही 591 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकवर आणि मनू भाकर 588 पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
परंतु मनूला फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.

Web Title :  Shooting World Cup | issf world cup rahi sarnobat grabs gold medal in 25 meters pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update