J & K : शोपियात 24 तासात दुसर्‍यांदा चकमक ! आणखी 4 अतिरेकी ठार, 5 तासापासून धुमश्चक्री सुरूच

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात गेल्या २४ तासात दुसर्‍यांदा अतिरेक्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक झाली आहे. पिंजोरा भागात पहाटे ३ वाजल्यापासून गेल्या ५ तासांहून अधिक काळ ही दुसरी चकमक सुरु आहे. त्यात किमान ४ अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पिंजोरा भागातील ही चकमक अजूनही सुरु आहे.

या अगोदर शोपिया जिल्ह्यातील रेबन विभागात सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचे ५ अतिरेकी रविवारी ठार झाले आहेत.

रेबन परिसरात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत हे पाच अतिरेकी ठार झाले आहेत. यावेळी चकमक झालेल्या ठिकाणावरुन आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रात्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हिज्बुल मुजाहिदीनचे हे कमांडर असल्याचे सांगितले जाते.