आता सुट्टी नाही ; रेल्वेतही कराल शॉपिंग ! 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मध्ये शॉपिंगची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा १६ मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. या साठी ट्रेनमध्ये कंपनीचे दोन सेल्समन कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेशासह असतील. त्यासोबत ट्रेनमध्ये शॉपिंग कार्ट उपलब्ध असणार आहे. प्रवासी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अथवा कॅश देऊन शॉपिंग करु शकतील.
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला ३. ६६ कोटी रुपयांमध्ये ५ वर्षांसाठी कंत्राट देण्यात आलं आहे.  ही सेवा जानेवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे . एकूण आठ टप्प्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. प्रत्येक टप्प्यात दोन ट्रेनमध्ये सेवा सुरू होईल. यापैकी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू होणार हे जवळपास नक्की आहे, इतर ट्रेनबाबत अद्याप माहिती नाही.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य इत्यादी वस्तू ट्रेनमध्ये विकण्याची परवानगी असणार आहे. ट्रेनमधील सेल्समनला सकाळी ८ते रात्री ९ वाजेपर्यंत सामान विक्रीची परवानगी दिली आहे यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like