Coronavirus Lockdown पुणे शहरातील ‘त्या’ परिसरातील मेडिकलची दुकाने, हॉस्पीटल वगळून इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त 2 तासासाठीच चालू राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. पुण्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आजच (मंगळवार) कोरोनामुळं तिघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळं शहरातील 8 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील ‘त्या’ परिसरातील सर्व मेडिकल शॉप आणि हॉस्पीटल वगळून इतर सर्व दुकाने फक्त 2 तास चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याबाबतचे आदेश देखील देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी खुप मोठं पाऊल उचललं आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची (किराणा, भाजीपाला आणि इतर) दुकाने उघडी राहणार आहेत. इतर कोणतही दुकान चालू राहणार नाही. याबबातचे आदेश काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् आणि सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे हे स्वतः लक्ष घालून सर्व आदेशाची अंमलबजावणी होतीय का हे पहात आहेत. प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन वेळावेळी केले आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर पोलिस आता कारवाई देखील करीत आहेत. खाली दिलेल्या परिसरातील दुकाने फक्त 2 तासांसाठी चालू राहणार आहेत.

‘या’ परिसरात संपुर्णपणे कर्फ्यू लागू –

खडक पोलीस ठाणे :
मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक, मोहसिन जनरल स्टोअर्स, शमा फॅब्रिकेशन, शहीद भगतसिंग चौक, उल्हास मित्र मंडळ, राजा टॉवर, इम्युनल चर्चची मागील बाजू, हाजी इसाक शेख उद्दीन पथ, पुष्पम ज्वेलर्स, मंगल क्लबजवळ महाराणा प्रताप रोड, मिठगंज पोलीस चौकी, रॉयल केटरर्स समोरील बोळ, जाहीद लेडीज टेलर्स, चाँदतारा चौक, मदिना केटरर्स, घोरपडे पेठ पोलीस चौकी, इकबाल स्क्रॅप सेंटर या ठिकाणांचे आतील परिसऱ

फरासखाना पोलीस ठाणे :
मंगळवार पेठेतील कागदीपूरा, मंगळवार पेठ १५७, मंगळवार पेठ गाडीतळ चौक, कामगार पुतळा रोड २२०, मंगळवार पेठ २२४, मंगळवार पेठ २२६, मंगळवार पेठ़
रविवार पेठ – गोविंद हलवाई चौक, हमजेखान चौक, गुरुद्वारा रोड, देवजीबाबा चौक

स्वारगेट पोलीस ठाणे :
मीनाताई ठाकरे वसाहत कमान – महर्षीनगरपासून ते गिरीधर भवन चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डावीकडील भाग, महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग ब्यासकडे जाणार्‍या रस्त्याचे डाव्या बाजूस असलेले सूर्यमुखी गणेश मंदिरपासून पुढे राधास्वामी सत्संग ब्यासपर्यंतची डावीकडील बाजू राधास्वामी सत्संग ब्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लॉट चौकापर्यंतचा डाव्या बाजूचा खिलारे वस्ती व पी अ‍ँड टी कॉलनी यांचे सीमा भिंतीपर्यंतचा भाग व राधास्वामी सत्संग ब्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लाँट चौकापर्यंचा उजव्या बाजूचा भाग डायस प्लॉट चौक ते सेव्हन लव्हज चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डायस प्लॉटपर्यतचा रस्त्याचा उजवीकडील भाग.

डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे (सातारा रोड) जाणार्‍या डायस प्लॉट चौकापासून मीनाताई ठाकरे वसाहत कमानपर्यंतचा डावीकडील भाग़ गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग ब्यास दरम्यानचा रस्ता

कोंढवा पोलीस ठाणे :
अशोका म्युज सोसायटी, आशिर्वाद चौक, मिठानगर, सत्यानंद हॉस्पिटल गल्ली, भैरोबा मंदिर, पीएमटी बसस्टॉप, संत गाडगे महाराज शाळा, साई मंदिर ब्रम्हा अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, शालीमार सोसायटी, कुमार पृथ्वी गंगाधाम रोड, मलीकनगऱ
या भागात संपूर्ण कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. या परिसरातील दुकाने फक्त 2 तास चालू राहणार आहेत.

You might also like