Pune : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत व्हेंटिलेटर असून सुद्धा ‘या’ कारणास्तव वापर होत नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या हे पुण्यात असल्याने. पुण्यात दैनंदिन रुग्णांची संख्या भीषण प्रमाणात वाढत आहे. तर यामुळे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांसह रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु, काही शासकीय हॉस्पिटलमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधेअभावी व्हेंटिलेटर उपलब्ध असून सुद्धा त्याचा वापर होत नसल्याची सद्यस्थिती समोर आली आहे.

या प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे की, वापरात येत नसलेले योग्य प्रकारचे व्हेंटिलेटर मनुष्यबळ असलेल्या खासगी रुग्णालयांना वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. तर पुण्यात शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाची संख्या झपाटयाने वाढत असल्याने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटांसह रेमडेसिव्हिर इंजेक्शन यांची आवश्यकता दाट भासत आहे. या कारणावरून ZP चे सीईओ आयुष प्रसाद यांनी याबाबत सर्व माहिती पुणे विभागीय आयुक्त राव यांना पत्राद्वारे दिली आहे.

दरम्यान, सरकारी आरोग्य संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) आणि अन्य सरकारी निधीमधून व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये अपुरे मनुष्यबळ तांत्रिक सुविधांचा अभाव आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे काही ठिकाणी व्हेंटिलेटरचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकत नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागातील खाटा, तसेच प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत. अशा संस्थेस करारनामा करून व्हेंटिलेटर आणि वापरायोग्य परंतु, शासकीय हॉस्पिटलमध्ये वापरात नसलेल्या यंत्रणा वापरण्यासाठी द्याव्यात, असे या प्रस्तावात सीईओनी म्हटलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध होतील. त्याचा रुग्णांना अधिक फायदा होणार आहे, असा विश्वासही व्यक्त होत आहे.