खळबळजनक ! बायको-मुलीवर जवानानं झाडल्या ‘गोळ्या’, जखमी पोरीनं बापावर केलं ‘फायरिंग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील मथुरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका सेवानिवृत्त जवानाने रागाच्या भरात आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पत्नी आणि मुलीवर गोळीबार केला. ज्यामुळे दोघी मायलेकी जखमी झाल्या, मात्र, जखमी मुलीनेही वडिलांकडून रिव्हॉल्व्हर हिसकावत वडिलांवर गोळी चालविली. ज्यात वडिलांचा मृत्यू झाला आहे.
मथुराच्या ठाणे नोहझील पोलिस स्टेशन परिसरातील मिथोली गावात हा प्रकार घडला. किरकोळ कौटुंबिक वादात सेवानिवृत्त जवान चेतरामने आपल्या पत्नी व मुलीवर त्याच्या रिव्हॉल्व्हरने गोळ्या घातल्या. ज्यात आई व मुलगी जखमी झाली. जखमी मुलीने पाहिले की तिच्या वडिलांनी आईवरदेखील गोळी झाडली. त्यांनतर मुलीने जखमी अवस्थेतच वडिलांकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत आणि वडिलांना गोळ्या घातल्या. मुलीच्या गोळीमुळे वडील जागीच ठार झाले. आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळताच जखमी आई व मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
यासंदर्भात मथुराचे एसएसपी शलभ माथूर म्हणाले की, कौटुंबिक वादातून निवृत्त सैन्याने त्यांच्या पत्नी व मुलीवर गोळीबार केला. मुलीने बचाव करत असताना वडिलांवर गोळीबार केला, त्यात वडिलांचा मृत्यू झाला. मुलगी आणि आईवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत हल्ल्यामागील कारण जाणून घेतले जात आहे.