‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं का ?’, ना. धों. महानोर म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांनी व्यक्त केलं आहे. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ करावं की करू नये यावरून बरीच मत-मतांतरं पाहायला मिळतात. ना. धों. महानोरांचं मत आहे की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान मिळावं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ना. धो. महानोर म्हणाले, “हा विषय जुनाच आहे. शेवटी राजकारण समाजकारण वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वैचारीक संस्था काम करतात त्या सगळ्यात एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे राजकारण हा मूळ स्तंभ आहे. राजकारण सगळ्यांचा गाभा आहे. त्यामुळे राजकारण्यांना बाजूला ठेवून कुठेही चालता येणार नाही.”

पुढे बोलताना महानोर म्हणाले, “राजकारणी व्यासपीठावर नको हा विषय डिसेंबर 1974 मध्ये पु.ल.देशपांडे अध्यक्ष असतानाही ठळकपणाने आला. नंतरही आला. अगोदरही आला. त्यावेळेस त्यांनी काय भूमिका घेतली असेल की, का नको आहे याची कारणं इचलकरंजी वाल्यांसारखी त्यांनाच माहिती आहे. यशवंतराव चव्हाणांसारखी जी माणसं होती अनेक राजकारणी त्यावेळेस होते. हा जो भाग आहे महाराष्ट्रात जसा आहे तसा शरद पवारांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मार्गाने काय करायचं ते केलं. अनेक असे राज्यकर्ते होते ज्यांनी ते केलं. देशात असे राज्यकर्ते आहेत की जे साहित्यिक होते.

राम मनोहर लोहियासारखा साहित्यिक माणूस राजकारणात होता. त्यांची अकरा पुस्तके आहेत. अटलबिहारी वाजपेयीदेखील स्वत: कवी होते. राजकारणाचा हा जो भाग आहे राजकारण्यांनीही समजला पाहिजे. मी कोणी त्याच्या वरचा आहे असे असल्याने मी जाणार नाही ही भूमिका नको. माझ्या व्यासपीठावर ते येतात का चर्चा करतात का माझी खुर्ची घेतात का? नाही.” महानोर म्हणाले, “मला असं वाटतं की, गेल्या महामंडळाची जी निवड झाली तो काळ आणि त्या काळाच्यानंतर ज्या पद्धतीने राजकारणातले बदल झाले ते पाहता त्यांनी निर्णय घेतला असावा. माझं त्यांच्यासोबत कोणाशी बोलणं नाही. कुठे बसावं याने माणूस काही मोठा होत नाही. मागे बसणारा मोठा साहित्यिकही प्रतिभावान असतो. मागे बसल्याने तो लहान होत नाही.” असेही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/