ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह 25 महिला मल्लांना कारणे दाखवा नोटीस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिक हिला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. विनापरवानगी राष्ट्रीय शिबीर सोडल्यावरून साक्षीला ही नोटीस बजावण्यात आली आहे. लखनौ येथील साई केंद्रात सहभागी ४५ महिला मल्लांपैकी २५ जणींनी कुठलेही कारण न देता शिबिराकडे पाठ फिरविली होती.

साक्षी मलिक (६२ किलो), सीमा बिस्ला (५० किलो), आणि किरण (७६ किलो), यांनी नुकतीच विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठली आहे. या तिघींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून बुधवारपर्यंत उत्तर मागितले आहे. तसेच अन्य मल्लांना पुढील राष्ट्रीय शिबिरातून निलंबित करण्यात आले आहे.

पूजा, नवज्योत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र –

विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याची पूजाकडे एक संधी आहे. तिने गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता. महिला मल्ल पूजा ढांडा व नवज्योत कौर यांनी सोमवारी लखनौमध्ये चाचणीसाठी मॅटवर न उतरताच विश्व चॅम्पियनशिपचे आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शिस्तभंगाच्या आरोपाखाली २५ मल्लांवर बंदी घातली आहे. त्यातील सात मल्ल या चाचणीत सहभागी होणार होत्या. ५९ व ६५ किलो वजन गटात दावेदारीसाठी अन्य दुसरा प्रतिस्पर्धी उपस्थित नव्हता.

अचानकपणे महिल मल्लांनी काढता पाय घेतल्यामुळे समोरच्यांना प्रतिस्पर्धी न राहिल्यामुळे त्या मल्लांविरोधात कारवाई करत नोटीस देण्यात आली होती या नोटीसला आता मल्ल काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –