ED ची वाट न पाहता आमची CD लावा : फडणवीस

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन- पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्याची झाली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही ईडी लावेल तर आम्ही सीडी लावू असे म्हणताय ना. जरूर सीडी बाहेर काढा, मग कशाची वाट पाहताय? असे आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना डुले आहे.

फडणवीस म्हणाले की, ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला असे तर त्यांच्याकडे काहीतरी माहिती असणार. त्याशिवाय ते छापा टाकणार नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. चूक झाली असेल तर ईडी कारवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असला तर खुशाल चौकशी करा असे ते म्हाणाले. पुणे पदवीधर मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असून प्रचार शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

You might also like