‘प्लास्टिकचं अंडं दाखवा आणि 1 हजार मिळवा’ : NECCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याकडे अंडी खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. थंडीच्या दिवसात तर अंड्यांना खूप मागणी असते. मात्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तसेच काही प्रसारमाध्यमांनी देखील प्लॅस्टिकच्या अंड्यांबात व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळं अंडी तर खायाची आहेत मात्र आपण खातो ती अंडी प्लॅस्टिकची तर नाहीत ना असा भ्रम ग्राहकांच्या मनात निर्माण होतो आहे. त्यामुळे अखेर या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी National Egg Coordination Committee (NECCA) ने आज चक्क प्लास्टिकचं अंड दाखवा आणि १ हजार मिळवा असंच आवाहन केलंय.

या आवाहनामुळे प्लास्टिक अंडी खरी आहेत की निव्वळ अफवा आहेत याचा खुलासा होईल असे NECCAने म्हंटलं आहे. याबरोबरच आज पुण्यात NECCA ने ताजी अंडी कशी ओळखावी यांच्याबद्दल देखील मार्गदर्शन केले.

ते प्लास्टिक नव्हे तर अंड्याचा पापुद्रा
एफडीएच्या तपासणीत देखील अद्याप एकही प्लास्टिकचं अंडं बाजारात आढळून आलं नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुळात जी अंडी प्लास्टिकची वाटतात ते मुळात अंड्याचे शेल मेंब्रेन अर्थात पापुद्रा असतो अशी माहिती डॉ. अजित रानडे यांनी दिली. एनईसीसीचे पुणे विभाग प्रमुख श्याम भगत यांनी तर प्लास्टिकचे अंडे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असं खुलं आव्हानच माध्यमांना देऊन टाकलं. त्यामुळे अंडी प्रेमींनी थंडीच्या दिवसात दणकून अंडी खावीत असं आवाहन करायला देखील ते विसरले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/