स्वार्थासाठी भाजप प्रवेश करणार्‍यांना त्यांची जागा दाखवा : अजित पवार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन(सुधाकर बोराटे) : – पाच वर्षात अच्छे  दिनचे  स्वप्न दाखवित भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेत आले मात्र शेतकरी,व्यापारी, युवकांचे रोजगार याबाबत घोर निराशा केली आहे.भाजप म्हणते कर्जमाफी व शिवसेना म्हणते कर्जमुक्ती युतीत असताना नेमके काय करणार हाच त्यांच्यात मेळ नाही. सध्याची निवडणूक महाराष्ट्राची  आहे भाजप मात्र देशाच्या गप्पा मारत आहेत अन त्या भाजपमध्ये  हर्षवर्धन पाटील गेले आहे. त्यांच्या साखर कारखान्यात ऊसाला चांगला भाव दिला नाही तसेच नाकर्तेपणामुळे दूध संघ बंद पाडला आहे  विकास करण्यासाठी भाजप प्रवेश केल्याचे सांगून इंदापूरकरांची दिशाभूल करण्यात येत असून त्यांनी निव्वळ स्वत: च्या स्वार्थासाठी भाजप प्रवेश केला असल्यामुळे अशांना त्यांची जागा दाखवा असा टोला  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिगवण येथिल जाहीर सभेत बोलताना लगावला.

महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ भिगवण  या ठिकाणी पवार यांची  जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार दत्तात्रय भरणे, जाल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जि.प. बांधकाम सभापती प्रविण माने, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे, हणूमंत बनसोडे,विक्रम शेलार, संजय सोनवणे, महारूद्र पाटील,अमोल भिसे,हनुमंत बंडगर,गणेश झगडे, अँड महेश देवकाते,बापूराव सोलनकर प्रताप पाटील,शीतल वणवे,धनाजी थोरात,नितीन काळंगे यांसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.अजित पवार यांनी भाजप शिवसेना सरकारच्या विविध धोरणांवर हल्ला चढविला. शेतीमालाला भाव नाही,दुष्काळी,पूरग्रस्त परिस्थिती यांना हाताळता आली नाही. धनगर,लिंगायत,मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविता आले नाही.  सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने पाच वर्षाच्या काळात काय दिवे लावले आहेत ? असा सवाल करत सरकारवर चांगलीच टिकेची झोड उठवली.

ज्यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केले त्यांची अवस्था काय केली आहे एकनाथ खडसे,विनोद तावडे,राज पुरोहित, चंद्रशेखर बावनकुळे  यांना उमेदवारी नाकारण्यात आली  तर ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्यांची ही अवस्था तर  तुमचे आमचे काय ? स्व. गोपीनाथ मुंडे यांचे चांगले काम होते एकेकाळी शेटजी- भटजीचा पक्ष अशी प्रतिमा मुंडे यांनी पुसून टाकली असे म्हणत भाजप सरकारचे वापरायचे अन फेकून द्यायचे हे धोरण आहे.त्याचप्रमाणे मित्र पक्षांमधील महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे,रामदास आठवले यांचीही वाईट  अवस्था केली आहे अशीदेखील खिल्ली उडवली.

जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी तालुका दत्तक घेण्याच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातले  हे मंत्री असून त्यांना काय आपल्या तालुक्यातील प्रश्नांची जाण असणार आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम चालले आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याला भाव चांगला दिला नाही ,नाकर्तेपणामुळे दूध संघ बंद पडला ,स्मृती इराणी यांनीदेखील  टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येईल असे सांगितले एवढ्या दिवस का केले नाहीत आत्ता मोठमोठी गाजरे दाखवण्याचा प्रकार चालू आहे आहे. मात्र भरणे यांनी तालुक्यासाठी निधी आणला व विकास साधला त्यामुळे त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

सरकारचे चांगले काम केले असते तर मुख्यमंत्री यांना शंभर ,अमित शहा  यांना वीस,पंतप्रधान यांना ९ सभा घेण्याची वेळच आली नसती. लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य दिल्याबद्दल आभार मानले. तालुक्यातील उजनी धरणाची उंची आपण जलसंपदा खात्याचा मंत्री असताना वाढवली व पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यामुळे कसलीही अडचण नव्हती मात्र या सरकारच्या काळात मात्र पाण्याची दयनीय अवस्था केली. आर. आर पाटलांनी बंद केलेले डान्स बार पुन्हा चालू केले आहेत. तसेच गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण राबविले. हे सरकारचित्र वागणं बरं नव्हे असा टोला हाणला. तालुक्यातील जनता कॉंग्रेसच्या विचाराची आहे आपण  सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन चाललो आहे.त्यामुळे कमळ वाढू देवू नका व तालुक्याच्या विकासासाठी दत्तात्रेय भरणे यांना अधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शेजारील सर्व तालुक्यातील आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले आपण कधीही गटा- तटाचा,जाती धर्माचा कधीही विचार  केला नाही सर्वसामान्यांना आपलेपणाची भावना दिली. नेहमी  विकासाचे राजकारण केले. ?१९ वर्ष मंत्री असताना त्यांनी काय केले? अजित पवार जलसंपदा मंत्री असल्यामुळे इंदापूरला पाणी मिळत होते. शेतकऱ्यांची त्यांना कणव होती मात्र तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम  हर्षवर्धन पाटील यांनीच केले.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी