आधी तुमची ‘पदवी’ दाखवा, मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची उडवली ‘खिल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून संवाद संधला. मात्र, मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमापूर्वीच सिनेअभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर टीका केली. परीक्षा पे चर्चा करण्यापूर्वी पदवी प्रमाणपत्र दाखवा, असा टोला प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्य़क्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. तर, सोशल मीडियातूनही काही ट्रोलर्सकडून मोदींच्या या कार्यक्रमावर टीका करण्यात येत आहे. याचदरम्यान, प्रकाश राज यांनी ट्विट करून परीक्षा पे चर्चा 2020 करने से पहले डिग्री का कागज दिखाओ असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केले. प्रकाश राज यांच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये मोदींना ट्रोल करणाऱ्या आणि राज यांचे समर्थन करणाऱ्या देखील प्रतिक्रिया आहेत.

नरेंद्र मोदी यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता मोदी आता तरुणांच्या रोजगारासंबंधी कधी चर्चा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना लगावला आहे. रोजगार निर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरुणांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –