महिलेला ‘मिडल फिंगर’ दाखवणं पडलं महागात, मेहुणा ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता रागाच्या भरात किंवा इतर एखाद्या कारणास्तव एखाद्या स्त्रीला हाताचे मिडल फिंगर (हाताचे मधले बोट) दाखविणे आपल्याला खूपच महागात पडेल. होय, दिल्लीत असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये एका महिलेने आपल्या मेव्हण्याविरूद्ध मधले बोट दाखविल्याबद्दल तक्रार दाखल केली. याचा परिणाम म्हणून, दोषीला आता जास्तीत जास्त तीन वर्षे शिक्षा आणि दंड भरावा लागू शकतो.

असे आहे प्रकरण :
जवळपास पाच वर्ष जुन्या दिल्ली येथील या प्रकरणात १८ सप्टेंबर रोजी निकाल देताना महानगर कोर्टाचे न्यायाधीश वसुंधरा आझाद यांनी दोषी ठरलेल्या शरद दुग्गल यांच्यावर कठोर भाष्य करीत असे म्हटले आहे की, “असे संकेत किंवा शब्द निर्विवादपणे स्त्री आणि तिचा स्वाभिमान यांचा अपमान आहेत.” ‘ खरं तर, २०१४ सालची ही घटना आहे, जेव्हा स्त्रीने तक्रार दिली की ती व्यक्ती अश्लील टीका करण्याशिवाय आणि तिला शारीरिक त्रास देत छेडछाडही करत होता. त्यानंतर आरोपींवर भादंवि ५०९ (शब्द, हावभाव किंवा एखाद्या स्त्रीचा विनयभंग केल्याचा आरोप) आणि आयपीसीच्या ३२३ (जाणूनबुजून दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सन २०१५ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीने स्वत:ला ‘दोषी नाही’ समजून चौकशीची मागणी केली. त्याने असा युक्तिवाद केला की हे प्रकरण मालमत्तेच्या वादाचे होते आणि त्या महिलेने खोटे आरोप केले आहेत. फिर्यादीने ४ साक्षीदार उपस्थित केले, त्यातील एक स्वत: तक्रारदार होता.

तथापि, या प्रकरणात मालमत्तेच्या वादाचे कोणतेही ठोस पुरावे कोर्टाला सापडले नाहीत. त्यामुळे आरोपीची साक्ष अवैध ठरले आणि त्याला दोषी ठरविण्यात आले. आता या प्रकरणात न्यायालय पुढील आठवड्यात मंगळवारी शिक्षा जाहीर करेल.

You might also like