गुलटेकडी – मार्केट यार्ड परिसरातील शारदा गजानन गणेश मंडळाकडून शिवराज्यभिषेक देखावा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे तो सजावटीसाठी जिवंत देखाव्यांसाठी आणि प्रतिकृतींसाठी. भाविकांमध्येही मंडळांच्या देखाव्याला घेऊन कमालीची उत्सुकता असते. यात पुण्यात अनेक मोठे गणपती येतात. त्यापैकीच एक म्हणजे गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील शारदा गजानन गणेश मंडळ. या मंडळाने या वर्षी शिवराज्यभिषेक देखावा सादर केला आहे.

पुणे शहरात  प्रतिष्ठित असणारे, गुलटेकडी मार्केटयार्ड येथील  श्री. शारदा गजानन मंडळ हे या वर्षी 41व्या  वर्षात  पदार्पण करीत आहे. या मंडळाकडून यावर्षी गणेश भक्तांसाठी शिवराज्यभिषेक देखावा सादर केला जात आहे. मागील वर्षी गुजरात येथील  सोमनाथ  मंदिराची प्रतिकृती साकारली होती. या देखाव्याचे क्षेत्रफळ सर्वसाधारण 70 फूट , लांब 40 फूट रुंद ,आणि 60 फूट उंच होते.

पुण्यातील अनेक मंडळे जिवंत देखावे सादर करत असतात. यामध्ये ऐतिहासिक , देशभक्तीपर , जनजागृती करणाऱ्या देखाव्यांवर भर दिला जातो. या वर्षी ऐतिहासिक , देशभक्तीपर , जनजागृती करणाऱ्या देखाव्यांबरोबरच वैज्ञानिक देखावेही सादर केले गेले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त