बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्रद्धा कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी सिनेमात रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ‘चालबाज इन लंडन’. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. विशेष बाब म्हणजे ती यात डबल रोलमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत. ती सतत तिचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करत असते.

अभिनेत्री आजकाल फुल ऑन व्हॅकेशनमध्ये मूडमध्ये आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना दिर्घकाळापासून डेट करतायेत. रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. श्रद्धाचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतायेत ते पाहून चाहत्यांचे म्हणणे आहे की बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ तिच्यासोबत आहे. श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. चाहत्यांना श्रद्धाचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो खूप आवडले आहेत. अभिनेत्रीसोबत बॉयफ्रेंड रोहनसुद्धा मालदीवमध्ये असल्याचा अंदाज तिचे चाहते लावतायेत. त्याचे झाले असे की रोहनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पाण्यात स्कूबा डायव्हिंग करताना फोटो ठेवला आहे. यावरुन दोघे एकत्र व्हॅकेशनवर गेल्याचा अंदाज लावण्यात येतो आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरने एका फोटोवर कमेंट करताना लिहिले, “तिथेच सेटल होऊन जा.”