अभिनेत्री श्रद्धा कपूरचा स्किन फिट जेगिनमध्ये दिसला वेगळाच ‘स्वॅग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बातमीमुळे सोशलवर चर्चेचा विषय बनली होती. यानंतर पुन्हा एकदा श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे. तसेही चर्चेत राहणं श्रद्धा कपूरसाठी नवीन नाही. तिचे फोटो सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत जे व्हायरल झाले आहेत. डान्स क्लास बाहेर श्रद्धा कपूर स्पॉट झाली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा आहे. तिची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच युनिक आणि स्टायलिश असते. समोर आलेल्या नवीन फोटो मध्ये श्रद्धा कपूर कमालीची सुंदर दिसत आहे. श्रद्धाच्या ड्रेसबद्दल सांगायचे झाले तर, श्रद्दाने ब्लॅक कलरचा टॉप घातला होता. टॉपला मॅचिंग करण्यासाठी तिने रेड कलरची स्किनफिट जेगिन घातली होती. यासोबतच श्रद्धाने लावलेला गॉगल आणि तिने सोडलेल्या मोकळ्या केसांमुळे तिच्या लुकला चार चांद लागले होते.

डान्स क्लासबाहेर स्पॉट झाल्यानंतर श्रद्धा मीडियासमोर पोज देताना दिसत होती. श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर श्रद्धा सध्या स्ट्रीट डान्सर 3 या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. लवकरच ती प्रभाससोबत साहो सिनेमातही झळकणार आहे. हा सिनेमा अ‍ॅक्शनने खचाखच भरपूर असणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहो हा प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे.

shraddha-k

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like