Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबच्या नव्या प्रेयसीची ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या (Shraddha Walkar Murder Case) तपासात आता आरोपी आफताब पूनावाला याची नवी प्रेयसी हिचा प्रवेश झाला आहे. आफताबने श्रद्धाच्या केलेल्या हत्येशी माझा काही संबंध नाही, असा दावा या नवीन मुलीने केला आहे. जेव्हा जेव्हा मी आफताबच्या घरी त्याला भेटायला जात असे, तेव्हा आफताबने या घरात श्रद्धाचे तुकडे ठेवले होते, याची मला कल्पनादेखील (Shraddha Walkar Murder Case) नव्हती, असे ही मुलगी म्हणाली आहे.

 

मे महिन्यात श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने या नवीन मुलीला जाळ्यात फसवले होते. दोघांची भेट त्याच बंबल अॅपवर झाली, ज्याद्वारे श्रद्धा आणि आफताब यांची भेट झाली होती. ही नवीन मैत्रीण ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती. 12 ऑक्टोबरला आफताबने तिला अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून ही अंगठी जप्त केली असून, तिचा जबाब नोंदवला आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर 30 मे रोजी हे दोघे संपर्कात आले. ही नवीन मैत्रीण मानसोपचारतज्ज्ञ आहे. आफताबने तिला त्याला अटक होईपर्यंत कशाचा अंदाज लागू दिला नाही. ज्यावेळी श्रद्धाचे तुकडे आफताबच्या फ्रिजमध्ये होते, त्यावेळी दोनदा ती त्याला घरी भेटून आली होती.

 

मला आफताबचे वागणे नेहमी सामान्य वाटत आले. तो खूप काळजीवाहू प्रकारातील मुलगा होता.
आफताबकडे विविध प्रकारच्या अत्तरांचा आणि परफ्यूमचा संग्रह होता. तो मला अनेकदा परफ्यूम भेट देत असे.
आफताबला भरपूर सिगारेट ओढण्याची सवय होती. आफताबला विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड होती.
तो विविध हॉटेलात गेल्यावर मासांहारी पदार्थ खात असे, असे यावेळी या नव्या मुलीने पोलिसांना सांगितले.
पोलीस तिच्याकडून अजून माहिती घेत आहेत.

 

Web Title :- Shraddha Walkar Murder Case | shraddha murder case aftab poonawalla new girfriend statement on dead body parts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर