Shraddha Walkar Murder Case | आफताबच्या नार्को चाचणीत नवीन खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shraddha Walkar Murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला याची न्यायालयाच्या परवानगीनंतर गुरुवारी नार्को चाचणी झाली. या चाचणीनंतर खुनाशी संबंधित अधिक माहिती उघड झाली आहे. यापूर्वी आफताबची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली होती. त्यातदेखील त्याने नवीन माहिती पोलिसांना दिली होती. (Shraddha Walkar Murder Case)

 

आजच्या या चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात आली. या नार्को चाचणीमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. तसेच हत्येनंतर त्यांने श्रद्धाचा मोबाइल आणि तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे कुठे टाकली, याचीदेखील माहिती दिली आहे. श्रद्धाचे कपडे, मोबाइल, हत्यारे आफताबने कुठे फेकली किंवा लपविली हे त्याने सांगितल्याने पोलिसांनी त्या ठिकाणाहून श्रद्धाचा मोबाइल आणि कपडे ताब्यात घेतले आहेत. चाचणीमुळे या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल, असे मानले जात आहे. (Shraddha Walkar Murder Case)

श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची दिल्लीत गळा दाबून हत्या केली होती.
त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते महारौलीच्या जंगलात फेकले होते.
आफताब आणि श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार मुंबई पोलिसांना मिळाली आणि हा प्रकार उघडकीस आला.
आफताबने आतापर्यंत पोलिसांना तपासात सहकार्य केले आहे.
त्याच्या दोन महत्त्वाच्या चाचण्यांमधून पोलिसांनादेखील धागेदोरे मिळत आहेत.
त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी आशा आहे.
आफताबला कठोरातील कठोर शिक्षा म्हणजे फाशी द्यावी, अशी मागणी संपूर्ण देश करत आहे.

 

Web Title :- Shraddha Walkar Murder Case | shraddha walkar murder case update aftab given information in narco test know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय