Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन- दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar Murder) प्रकरणाची आज दिल्ली कोर्टात सुनवाई झाली. या सुनवाईसाठी आरोपी आफताबला आज दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले. याच दरम्यान वकिलांनी दिल्ली कोर्टाबाहेर प्रचंड गोंधळ घातला. वकिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. श्रद्धा वालकरच्या हत्येसाठी (Shraddha Walkar Murder) आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी वकिलांनी केली आहे.

श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Walkar Murder) आरोपी आफताबच्या (Aftab Poonawala) पोलिस कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच त्याची नार्को चाचणी (Narco test) करण्याची परवानगी दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. आफताबनेही त्याची नार्को टेस्ट घेण्यास संमती दिली आहे. दरम्यान वकिलांनी न्यायालयाच्या आवारात, “श्रद्धाचा मारेकरी असलेल्या आफताबला फाशी द्या” अशी जोरदार घोषणाबाजी केली.

श्रद्धा आणि आफताब याच बंबल डेटिंग अ‍ॅपवर एकमेकांच्या संपर्कात आले होते. कुटुंबाने विरोध केल्यामुळे श्रद्धाने
घर सोडले आणि आफताबसह दिल्लीत आली. पण आफताब लग्नासाठी तयार होत नसल्याने त्यांच्यात सतत
वाद होत होता. असाच एक वाद विकोपाला केला आणि आफताबने तिची गाळा दाबून हत्या (Shraddha Walkar)
केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे ३५ तुकडे केले. पोलिसांना अजूनही श्रद्धाचे शिर,
मोबाईल आणि हत्येत वापरलेले हत्यार (Weapon) सापडलेले नाही. पोलीस त्यांचा सातत्याने शोध घेत आहेत.
शिवाय, दिल्ली पोलिसांना आफताबला उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशात
(Himachal Pradesh) घेऊन जायचे आहे. श्रद्धा आणि आफताब हे दोघे या दोन्ही ठिकाणी फिरायला गेले होते.

Web Title :-Shraddha Walkar Murder | shraddha murder hearing high drama outside delhi court lawyers seek death penalty for aftab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार