Coronavirus : ऊर्जा मंत्रालयातील कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, इमारत करणार बंद ?

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोना वाढत असून आता राजधानी दिल्लीतल्या ऊर्जा मंत्रालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. मंत्रालयातला एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली. संबंधित कर्मचारा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसत होता. त्यामुळे इमारत तत्काळ बंद करण्यात आली आहे. आता ऊर्जा मंत्रालयाचे मुख्यालय असलेली ‘श्रम शक्ती’ ही इमारत पूर्ण सॅनिटाइज करण्यात येणार आहे. हा कर्मचारी कुणा कुणाच्या संपर्कात आला याचीही माहिती काढली जात असून त्यांना घरातच क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे लॉकडाउन असतानाही देशातील विविध राज्यात बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. लॉकडाऊन संपायला आता सहा दिवस रहिले असून त्यानंतर काय होणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

लॉकडाऊनमुळे देशातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. लाखो मजुरांचे काम बंद झाल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुनही हजारो मजूर रस्त्याने चालत घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व प्रश्नांवर चर्चा या बैठकीत होणार असून 17 मेनंतरचा रोडमॅप तयार केला जाणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.