Shravan Month 2023 | या वर्षीचा श्रावण खास; यंदा येणार तब्बल 8 श्रावणी सोमवारी, जाणून घ्या कारण

Shravan Month 2023 | shravan somvar when will start shrawan somwar this year lord shiva bhakti
file photo

पोलीसनामा ऑनलाइन – Shravan Month 2023 | श्रावण महिना हा हिंदू धर्मात एक पवित्र महिना मानला जातो. श्रावणामध्य़े भगवान शिवची (Lord Shiva) आराधना केली जाते. अनेक शिवभक्त श्रावण महिन्यात उपवास करतात आणि शिवारधना करतात. श्रावण महिन्यात अनेक महत्त्वाचे सण देखील येतात. मात्र या वर्षीचा श्रावण महिना हा वेगळा आणि खास आहे. दरवर्षी श्रावणात 4 किंवा 5 श्रावणी सोमवार (Shravani Somwar) येतात. मात्र यावर्षी तब्बल 8 श्रावणी सोमवार येणार आहेत. यंदाचा (Shravan Month 2023) श्रावणाचा कालावधी हा तब्बल 59 दिवसांचा म्हणजे दोन महिन्यांचा असणार आहे.

यंदा अधिक मासामुळे (Aadhik Month) श्रावण महिन्याचा कालावधीही वाढला आहे. अधिक मास आल्यामुळे यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात ही 18 जुलै रोजी होणार आहे तर शेवट 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. उत्तर भारतात श्रावण महिना लवकर सुरू होतो. उत्तर भारतात श्रावणाची सुरुवात 4 जुलै रोजी होते आणि तो 31 ऑगस्टपर्यंत असेल.18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत मलमास अधिक असेल. म्हणजे या काळात भगवान शंकरासोबत भगवान विष्णूचीही (Lord Vishnu) पूजा करण्याचा लाभ भक्तांना मिळणार आहे.

श्रावण अधिकमासमुळे विविध सणांच्या तारखा देखील बदलल्या आहेत. व्रताची पौर्णिमा 1 ऑगस्ट 2023 रोजी असेल. संकष्टी चतुर्थी 4 ऑगस्ट 2023, पुरुषोत्तम महिना 16 ऑगस्ट रोजी संपेल. व्रताची पौर्णिमा, यजुर्वेदीयांचे उपकर्म, रक्षाबंधन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. ऋग्वेदाचे उपकर्म 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरवर्षी आषाढ पौर्णिमेच्या एक महिन्यानंतर रक्षाबंधन येते. यंदा रक्षाबंधन लांबले असून 2 महिन्यांनंतर 30 ऑगस्टला रक्षाबंधन (Rakshabandhan 2023) असणार आहे.

श्रावणातील शिवभक्तीला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त आर्वजून श्रावणाची वाट पाहत असतात. या महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे भोग चढवले जातात. श्रावणी सोमवारी मंदिरात भक्तांची मांदियाळी जमलेली दिसते. सर्वत्र प्रसन्न वातावरण श्रावणात पाहायला मिळते. या वर्षी शिवभक्तांना आराधना करण्यासाठी अधिक श्रावणी सोमवार मिळणार आहेत. (Shravan Month 2023)

या वर्षीच्या श्रावणी सोमवारच्या तारखा (Shravani Somwar 2023)

24 जुलै – श्रावणाचा पहिला सोमवार

31 जुलै – श्रावणाचा दुसरा सोमवार

7 ऑगस्ट – श्रावणाचा तिसरा सोमवार

14 ऑगस्ट – श्रावणाचा चौथा सोमवार

21 ऑगस्ट – श्रावणाचा पाचवा सोमवार

28 ऑगस्ट – श्रावणाचा सहावा सोमवार

4 सप्टेंबर – श्रावणाचा सातवा सोमवार

11 सप्टेंबर – श्रावणाचा आठवा सोमवार

टीप – आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Web Title : Shravan Month 2023 | shravan somvar when will start shrawan somwar this year lord shiva bhakti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shasan Aplya Dari | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | पुणे : निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

CM Eknath Shinde | ‘असा मुख्यमंत्री कधी पाहिलाय का? जे बोलतो ते…’ – एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Total
0
Shares
Related Posts