नवी दिल्ली : श्रावण महिना (Shrawan 2021) यावेळी 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अशी मान्यता आहे की हिंदू पंचांगातील हा महिना भगवान शंकाराला खुप प्रिय आहे. यासाठी त्यांची विशेष पूजा या महिन्यात केली जाते. कावड यात्रेची परंपरासुद्धा याच महिन्यात (Shrawan 2021) पार पाडली जाते. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे यावेळी रस्त्यांवर शिवभक्तांची गर्दी दिसणार नाही.
Shrawan 2021 5 things not to use in worship of lord shiva
या महिन्यात भगवान शंकराला जल अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे. परंतु मान्यतेनुसार काही अशा सुद्धा वस्तू आहेत ज्यांचा वापर शिवपूजेत करू नये. याबाबत जाणून घेवूयात…
भगवान शंकराच्या पूजेत कधीही वापरू नका ‘या’ 5 गोष्टी
1. तुळस :
हिंदू धर्मात तुळशीला खुप महत्व असले तरी भगवान शंकराच्या पूजेत चुकूनही तुळशीच्या पानांचा वापर करू नये.
2. नारळ :
नारळाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. यासाठी नारळाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करू नये. भगवान विष्णुंच्या पूजेत याचा वापर आवश्य करा.
3. केतकी आणि केवड्याचे फूल :
शंकराच्या पूजेत केतकीचे फूल अर्पण करू नये. यापाठीमागे एक पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेव आणि विष्णुंमध्ये श्रेष्ठ कोण, यावरून वाद झाला होता. ब्रह्म देवाने तेव्हा स्वताला श्रेष्ठ सांगण्यासाठी आणि शिवलिंगापर्यंत पोहचण्याच्या दाव्यासाठी केतकीच्या फुलाला साक्षीदार बनवले होते. केतकी पुष्पाच्या खोट्या साक्षीमुळे शंकर नाराज झाले आणि आपल्या पूजेत त्याचा वापर न होण्याबाबत त्यांनी म्हटले होते.
4. शंख :
भगवान शंकराच्या पूजेत शंखाचा वापर कधीही करू नये. एका पौराणिक कथेनुसार शंकरांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. शंखाला शंखचूडचे प्रतिक मानले जाते. असे म्हणतात की, शंखचूड भगवान विष्णुंचा भक्त होता.
5. तिळ :
तिळाचा वापर सुद्धा भगवान शंकराच्या पूजेत केला जात नाही. शिवलिंगावर ते कधीही अर्पण करू
नये. असे म्हटले जाते की, तिळ भगवान विष्णुंच्या मैलापासून उत्पन्न झाले आहे. यासाठी ते
शंकराला अर्पण करू नये. शिवशंकराला हळद आणि कुंकू सुद्धा अर्पण केले जात नाही.
श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेत भांग, धोतरा, बेर चंदन, बेलपत्र, फळे आणि फूले इत्यादीचा वापर करा. हे सर्व त्यांना प्रिय आहे. तर, माता पार्वतीसाठी महिला सौभाग्याचे प्रतिक जसे की बांगड्या, सिंदूर इत्यादी अर्पण करू शकतात.
Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला (Video)