श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिर दर्शनासाठी 17 मार्चपासून बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावामुळं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं दि. 17 मार्चपासून मंदिर जनहितासाठी पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

dagadushet

कोरोनामुळं संपुर्ण देशात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 100 पार झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुण्यातील आहे. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत यापुर्वीच सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक देवस्थानांनी मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय यापुर्वीच घेतलेला आहे. आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने देखील दि. 17 मार्चपासून जनहितासाठी पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने यांनी दिली.