Shreemant Dagdusheth Halwai Music Festival | यंदा गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणार श्रीमंत ‘दगडूशेठ’चा संगीत महोत्सव; 9 दिवस रंगणार कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shreemant Dagdusheth Halwai Music Festival | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या मार्फत प्रतिवर्षी गुढीपाडवा (Gudipadva 2022) ते रामनवमी (Ramnavami) दरम्यान 9 दिवस संगीत महोत्सवाचे (Shreemant Dagdusheth Halwai Music Festival) आयोजन करण्यात येते. गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे महोत्सव रद्द केला होता. यावर्षी मात्र महोत्सव होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यंदाही 9 दिवस हा महोत्सव रंगणार आहे.

 

पुण्यातील (Pune News) गणेश कला क्रीडा मंच याठिकणी हा महोत्सव कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाची व्यवस्था सुवर्णयुग तरूण मंडळाकडून करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रवेशही विनामूल्य आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला दरवर्षी संगीत महोत्सवाला प्रारंभ होतो.
मागील अनेक वर्षे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.
तर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे.

 

दरम्यान, हा महोत्सव २ एप्रिल ते 10 एप्रिल असा असणार आहे. शनिवारी 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 सनई व व्हायोलिन जुगलबंदी आहे.
यानंतर सायंकाळी 7 ते 10 स्वराभिषेक असणार आहे. रविवारी देखील कोल्हापूरचं स्वरनिनादची विशेष उपस्थिती असणार आहे.

 

Web Title :- Shreemant Dagdusheth Halwai Music Festival starting from gudipadva pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

 

Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील दुबईत रणवीर सिंहसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओनं घातला धुमाकूळ

 

PMC PMAY Scheme Online Lottery | पुणे महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1030 रिक्त सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत; यादी जाहीर

 

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना