…म्हणून डान्स करतानाच ‘या’ अ‍ॅक्ट्रेसने राहुल महाजन याच्या कानशिलात लगावली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नच बलिएच्या सेटवर एका अ‍ॅक्ट्रेसने राहुलला जोरात कानशिलात लगावली आहे. डान्स रिअ‍ॅलिटी ‘शो नच बलिए ९’ चा प्रीमियर लवकरच होणार आहे. यावेळी या डान्स शो मध्ये मोठमोठे स्टार्स सहभागी होताना दिसणार आहे.

यावेळी ‘नच बलिए’च्या ग्रँड प्रीमियरला सर्वात जास्त आकर्षक बनवण्यासाठी टीव्हीचे नामवंत चेहरे गेस्ट म्हणून येणार आहेत. यामध्ये अ‍ॅक्ट्रेस श्रेणु पारिख आणि बिग बॉस मध्ये दिसलेला राहुल महाजन गेस्ट म्हणून येणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, मंगळवारी शोच्या प्रीमियरची तयारी सुरु होती. यादरम्यान श्रेणुने राहुलच्या कानशिलात लगावली. ही माहिती पाहता पाहता आगीसारखी पसरली.

अनेकांना प्रश्न पडला असेल की, श्रेणुने अखेर राहुल महाजन याच्या कानशिलात का लगावली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. कारण ही कानशिलात जाणून बुजून मारण्यात आलेली आहे. कानशिलात लगावल्याची बातमी जास्त पसरल्यानंतर नच बलिएकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, श्रेणुने राहुलला यासाठी कानशिलात लगावली आहे कारण त्यांचा डान्स अ‍ॅक्टच तसा आहे. असे समजत आहे की, ‘सेकंड हँड जवानी’ या गाण्यावर दोघेही थिरकताना दिसणार आहे.

सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या कानशिलात लगावण्यासाठी श्रेणुची खूपच समजूत काढावी लागली. आधी तर श्रेणु राहुलच्या कानशिलात लगावण्यासाठी तयारच नव्हती. यानंतर राहुलने स्वत: तिची समजूत काढली तेव्हा त्यानंतर ती यासाठी तयार झाली.

याबाबत बोलताना श्रेणु म्हणाली की, “राहुलसोबत काम करताना खूप छान वाटलं. मात्र त्याला मारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. राहुलनं मला प्रोत्साहन दिल्याने मी हे करु शकले.” या सत्राचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी