Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

पोलीसनामा ऑनलाइन : Shreya Bugade | आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचबरोबर कॉमेडी क्वीन म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच चर्चेत असते. श्रेयाने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे. तिच्या या विनोदी अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक करतात. श्रेया मात्र एका दुसऱ्याच विनोदवीराची चाहती असल्याचे तिने सांगितले. (Shreya Bugade)

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेयाला लोकप्रियता मिळाली. श्रेया मात्र ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील समीर चौघुलेची मोठी फॅन असल्याचे सांगितले आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर समीर सोबतचा फोटो शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे. फोटो शेअर करत तिने छानसे कॅप्शनदेखील दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, “मी ज्याची खूप मोठी फॅन आहे. आज तो खूप दिवसांनी भेटला”. सध्या श्रेयाची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. (Shreya Bugade)

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून समीर चौगुले घराघरात पोहोचला. समीरचे प्रत्येक डायलॉग चाहत्यांच्या आजही तोंडात आहेत. समीरची अचूक टायमिंग चाहत्यांना फारच आवडते. समीरच्या अभिनयाचे तर प्रत्येक जण कौतुक करत असतो. आता त्याच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये श्रेया बुगडेचेही नाव सामील झाले आहे.

Web Title :- Shreya Bugade | marathi actress shreya bugde is fan of maharashtrachi hasyajatra fame samir choughule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

Shahaji Maharaj | कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार

Prakash Ambedkar | ‘तूर्तास काही घाई नाही…’ ! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चेची बातमी प्रकाश आंबेडकरांनी फेटाळली