… म्हणून श्रेया घोषालने केलं नाही गायकाबरोबर लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या जादुई आणि गॉड आवाजाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या श्रेया घोषाल हिचा आज ३७ वा वाढदिवस. वयाच्या १६ व्या वर्षी तिने ‘सा रे गा मा’ ची विजेती बनून आपल्या गायन प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिचा हा प्रवास सुरु आहे. दरम्यान तिला चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. श्रेयाने वाढदिनादिवशी तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

माधुरी दीक्षित पासून शाहिद कपूर पर्यंत आणि जॉन अब्राहम पासून जूही चावला पर्यंत असे अनेकजण चित्रपटसृष्टीत आहेत कि त्यांनी जोडीदार म्हणून या इंडस्ट्रीच्या बाहेरच्या व्यक्तीची निवड केली. अगदी तसेच श्रेयानेही आपल्या जोडीदाराची निवड खूप विचारपूर्वक केली. तिने यासाठी तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यची निवड केली आहे. १० वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०१५ साली श्रेयाने त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सहा वर्षांनंतर आता ती प्रेग्नन्ट असल्याची बातमी खुद्द श्रेयाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिली.

श्रेयाचा पती शिलादित्य एक इंजिनिअर आहे. दोघांचे वेगवेगळे प्रोफेशन असूनही एकमेकांना सांभाळून घेताना दिसतात. श्रेयाने सांगितल्याप्रमाणे, तिने मुद्दाम या इंडस्ट्रीच्या बाहेरील व्यक्तीची पती म्हणून निवड केली. त्याचं कारण म्हणजे, दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीला तिला जाणून घेण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. जर तिने एखाद्या गायकाला डेट केलं असतं तर त्यांनी रोज त्याच विषयावर गप्पा मारल्या असत्या. परंतु आता त्यांच्याकडे बोलायला इतरही विषय असतात. श्रेयाने आजपर्यंत इंडस्ट्रीमधील एकाही गायकाला डेट केलं नाही.