ऋषभ पंतचे स्थान धोक्यात? चौथ्या क्रमांकासाठी ‘हा’ खेळाडू नक्की ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान भारतीय संघाची चौथ्या क्रमांकावरील खेळाडू सर्वात मोठी समस्या होती. त्यामुळे वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यांत भारतीय संघाला अनपेक्षित पराभव देखील स्वीकारावा लागला होता. मात्र वर्ल्डकप उलटून गेल्यानंतर देखील हि समस्या भारतीय संघाची पाठ सोडताना दिसून येत नाही. भारतीय संघ व्यवस्थापणाने रिषभ पंत याला चौथ्या क्रमांकावरील खेळाडू म्हणून निवड केली होती. मात्र त्याला देखील विशेष कामगिरी करता न आल्याने भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता भारतीय संघ विंडीजच्या दौऱ्यावर असून टी-२० मालिका ३-० अशी आपल्या नावावर केली असून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत देखील १-० अशी आघाडी घेतली आहे. या दौऱ्यावर रिषभ पंत याला चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली असून महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी देखील त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या रिषभ पंत हा बेजबाबदार फटका खेळून बाद झाला.त्यानंतर पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या श्रेयस अय्यर याने शानदार फलंदाजी करत ७१ धावांची खेळी केली. त्याने अतिशय संयमी खेळी करत चौथ्या क्रमांकासाठी आपली दावेदारी स्पष्ट केली. त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर उत्तम भागीदारी करत कोहलीला देखील प्रभावित केले. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी त्याने आपली मजबूत दावेदारी ठोकली आहे.

पंतची सरासरी अवघी २५. ४४
रिषभ पंत याने आतापर्यंत ११ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये नऊ डावांत २५. ४४ च्या सरासरीने अवघ्या २२९ धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम खेळी हि ४८ धावांची असून ९७. ०३ चा स्ट्राईक रेट आहे.

श्रेयसच्या नावावर ६ डावांत ३ अर्धशतके
श्रेयसच्या या आकडेवारीवरून तुम्हाला अंदाज आला असेल कि, तो किती उपयुक्त खेळाडू आहे. त्याने खेळलेल्या ८ एकदिवसीय सामन्यांत तीन अर्धशतकाच्या मदतीने २८१ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत पाचव्या क्रमांकावर खेळ केला असून तो चौथ्या क्रमांकासाठी देखील उपयुक्त खेळाडू आहे.

कर्णधार कोहलीदेखील प्रभावित
दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर याने केलेल्या शानदार खेळीने कर्णधार विराट कोहली देखील प्रभावित झाला असून कालच्या सामन्यांनंतर कोहली म्हणाला कि, त्याने एक बाजू सांभाळून धरल्यामुळे दुसऱ्या बाजूला मला ताण आला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –