Shreyas Iyer | सुनिल गावसकरांकडून कॅप घेणार्‍या श्रेयसनं पदार्पणाच्या कसोटीत केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी, जाणून घ्या नेमकं काय केलं

कानपुर : वृत्तसंस्था – Shreyas Iyer | मुंबईच्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कानपूरमध्ये टेस्ट (Kanpur Test) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले आहे. पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. महान क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी श्रेयसला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कॅप दिली होती. यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे श्रेयसनं कानपूरच्या मैदानात त्यांचे मेव्हणे आणि दिग्गज क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Vishwanath) यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दिग्गज क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1969 साली कानपूरमध्येच ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळी पदार्पणाच्या टेस्टमध्येच गुंडप्पा विश्वनाथ यांनी शतक झळकाले होते.

 

श्रेयस पहिल्या दिवशी 75 रनवर नाबाद राहिला. यानंतर आज सकाळी त्याने सकारात्मक खेळ करून आपले पहिले टेस्ट शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसी सकाळी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) झटपट बाद झाला. पहिल्या दिवशी अर्धशतक करणाऱ्या जडेजाला दुसऱ्या दिवशी एकही रन करता आला नाही. न्यूझीलंडचा (New Zealand) फास्ट बॉलर टीम साऊदीने (Tim Southee) त्याला आउट केले. श्रेयस आणि जडेजानं पाचव्या विकेटसाठी 121 रनची पार्टनरशिप केली. जडेजा आऊट झाल्यानंतरही श्रेयसने कोणतेही दडपण न घेता आपले शतक पूर्ण केले.

 

श्रेयसनं (Shreyas Iyer) टेस्ट कारकिर्दीमधील पहिले शतक 157 बॉलमध्ये पूर्ण केले.

या खेळीदरम्यान श्रेयसने 12 फोर आणि 2 सिक्स लगावले. पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता श्रेयसनं स्थान पटकावले आहे.
लाला अमरनाथ (Lala Amarnath), गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Vishwanath),
मोहम्मद अझहरुद्दीन (Mohammad Azharuddin), प्रवीण आम्रे (Praveen Amre), सौरभ गांगुली(Saurabh Ganguly),
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), सुरेश रैना (Suresh Raina), शिखर धवन (Shikhar Dhawan), रोहित शर्मा (Rohit Sharma),
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्ये शतक झळकाले आहे.

 

Web Title :- Shreyas Iyer | india vs new zealand ind vs nz shreyas iyers smashed hundred in the debut test join

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अनाधिकृत बांधकामावरील कारवाईला विरोध करुन पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

Bhediya Poster | वरूण धवनच्या आगामी चित्रपट ‘भेडिया’चं पोस्टर आऊट, वरूण दिसणार ‘त्या’ भूमिकेत