Shreyas Iyer | 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ‘तो’ रेकॉर्ड श्रेयसने केला

0
62
Shreyas Iyer | india vs new zealand kanpur test shreyas iyer is the first indian player to score a hundred in one innings and a fifty in the another on test debut
File Photo

कानपुर : वृत्तसंस्था –  कानपूर टेस्टच्या (Kanpur Test) चौथ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था 5 आऊट 51 अशी बिकट झाली होती. यानंतर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) आर. अश्विन (R. Ashwin) आणि नंतर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांच्या मदतीनं टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. श्रेयसनं 94 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमधूनच पदार्पण केले आहे. श्रेयसने पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावत 105 रन काढले होते. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय ठरला आहे.

यापाठोपाठ श्रेयसनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
हा रेकॉर्ड भारतीय क्रिकेटच्या 89 वर्षांच्या इतिहासात आजवर कोणालाच जमला नाही आहे.
त्यानं पदार्पणातील टेस्टच्या एका इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या टेस्टमध्ये आत्मविश्वासानं खेळत होता.
यानंतर न्यूझीलंडच्या (New Zealand) टीम साऊदीनं (Tim Southee) त्याची विकेट घेतली.
श्रेयसने आपल्या खेळीत 125 बॉलचा सामना करत 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 65 रन काढले.

श्रेयसनं (Shreyas Iyer) या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडिया अडचणीत असताना चांगली खेळी करून टीमला सावरले आहे.
पहिल्या इनिंगमध्ये 3 आऊट 106 असा स्कोअर असताना श्रेयस बॅटींगला आला आणि त्याने शतक झळकावल्यानं टीम इंडियाला 345 पर्यंत मजल मारता आली.
दुसऱ्या इनिंगमध्येसुद्धा 3 आऊट 41 अशी बिकट परिस्थिती असताना श्रेयस मैदानात आला आणि त्याने
अश्विनसोबत 52 रनची आणि नंतर साहासोबत 66 रनची भागिदारी करत टीम इंडियाची आघाडी 200 च्या पुढे नेली आहे.
या इनिंगद्वारे त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे.

 

Web Title : Shreyas Iyer | india vs new zealand kanpur test shreyas iyer is the first indian player to score a hundred in one innings and a fifty in the another on test debut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Gautam Gambhir | आठवड्याभरात गौतम गंभीरला तिसऱ्यांदा मिळाली जीवे मारण्याची धमकी !

Malaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर सेल्फी, तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांचा वाढला ‘पारा’