Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shreyas Talpade | छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेचा शेवटचा सीन शूट करण्यात आला आहे. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे या सोबतच परी म्हणजेच मायरा वैकुळ देखील घराघरात पोहोचली होती. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. त्यातच आता श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Shreyas Talpade)

 

नुकतीच श्रेयसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा शूटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंतचे मेमरीज त्यांनी या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, “शो संपतोय….आपलं नात नाही….आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….Picture अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??” त्याच्या या कॅप्शन ने आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Shreyas Talpade)

श्रेयसच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. “खूप खूप मिस करू”,
“तुमची मालिका खूपच छान होती”, “मालिका संपायला नको होती”, “कायम लक्षात राहील
अशी मालिका” अशा एक ना अनेक कमेंट श्रेयसच्या या व्हिडिओवर येत आहेत.
तर प्रेक्षक आणि कलाकारांनी देखील मालिका संपत असल्याने नाराजी ही व्यक्त केली आहे.
मात्र आता श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टमुळे पुन्हा मालिका आधी सारखी ब्रेक घेऊन नव्याने भेटीला येणार
का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

Web Title :-  Shreyas Talpade | Shreyas Talpade gave ‘Hi’ big hint about the second part of the serial ‘Majhi Tuji Reshimagath’; The post went viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान