Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : Shreyas Talpade | पुष्पा या चित्रपटाने ओटीटी फ्लॅटफॉर्म आणि त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग, गाणे, संवाद प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन च्या अभिनयाचे देखील भरभरून कौतुक झाले. तर पुष्पाला हिंदीत आवाज देणाऱ्या मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेची ही तेवढीच प्रशंसा झाली आहे. (Shreyas Talpade)

पुष्पा द राईज चा हिंदी भाषेत अल्लू अर्जुनला श्रेयस तळपदेने आवाज दिला होता. यातील प्रत्येक संवाद हिट ठरला होता. त्याच्या या आवाजाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्यावर अनेक रिल्स आणि मिम्स देखील बनले गेले होते. या अनुभवानंतर श्रेयसला आलेले ऑफर्स आणि अनुभव श्रेयसनी एका मुलाखतीत उघड केले आहे. (Shreyas Talpade)

 

 

या गोष्टींबद्दल सांगताना श्रेयस म्हणाला “एखादं चित्रपट तुमचं करिअर कुठून कुठे घेऊन जातं हे काही सांगता येत नाही. मी जरी पुष्पा या चित्रपटात पडद्यावर नसलो तरी प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले आणि हे माझे भाग्यच आहे. पुष्पा चित्रपटानंतर माझ्याकडे डबिंग साठी अनेक ऑफर्स आल्या आहेत. त्यातील काही मी स्वीकारल्या देखील आहेत. मध्यंतरी मी ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी आवाज दिला होता आणि आता ‘पुष्प – 2’ साठी मला संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो”.

पुढे बोलताना श्रेयस म्हणाला “अल्लू अर्जुन तर हा माझा आवडता अभिनेता आहे.
त्याच्या या चित्रपटाचा छोटासा भाग होणे हे माझे भाग्य आहे. एवढेच नाही तर दिग्दर्शक सुकुमार यांचे
देखील मनापासून आभार”. श्रेयसच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास श्रेयस नुकताच ‘कौन प्रवीण तांबे’
या बायोपिक मध्ये झळकला होता. तर तो आता ‘एमर्जन्सि’ या कंगनाच्या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title :- Shreyas Talpade | shreyas talpade says he received lots of offers after allu arjun starrer pushpa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…

Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर

Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग