home page top 1

अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीचं नाव वापरून ‘तो’ करतोय फसवणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता श्रेयस तळपदे सध्या बॉलिवूडमध्ये जास्त अॅक्टीव नाही परंतु तो अनैच्छिक कारणांमुळे वादात सापडत असतो. नुकतंच श्रेयसने सांगितलं आहे की, त्याच्या पत्नीच्या नावाचा वापर करत एका माणसाने कपट कारस्थान केलं आहे. श्रेयसने सांगितले आहे की, ज्या माणसाने त्याच्या पत्नीच्या नावाचा वापर केला आहे तो स्वत:ला अॅमेझॉनचा कास्टिंग हेड सांगत आहे.

श्रेयस म्हणाला की, “जेव्हा आम्हाला याबाबत समजलं तेव्हा मी आणि माझी पत्नी दीप्ती हैराण झालो होतो. एका मित्राने मला स्क्रिनशॉट्स पाठवले होते. एका पोस्टरमध्ये दीप्तीच्या फोटोंचा वापर करण्यात आला होता. हे आमच्यासाठी खूप डिस्टर्ब करणारं होतं.”

श्रेयस म्हणाला की, “मला असं वाटतं की, लोकांना याबाबत कळायला हवं. दीप्ती एक स्वतंत्र प्रोड्युसर आहे आणि तिने काही चांगले सिनेमे बनवले आहेत. ती अॅमेझॉनची कास्टींग डायरेक्टर नाही. मी आशा करतो की, कोणताही व्यक्ती या माणसाकडून धोका खाणार नाही.” सर्वांना समजलं आहे की, श्रेयसची पत्नी दीप्तीचं नाव वापरून लोकांना गंडवण्याचं काम एक माणूस करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, या फ्रॉड माणसाने सोशल मीडियावर स्वत:ला दीप्ती सांगितले आहे. शिवाय तो लोकांना प्रोफाईल मागत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दीप्तीने काही मराठी सिनेमे प्रोड्युस केले आहे. पोस्टर बॉईज, बाजी आणि सनई चौघडे हे तिचे काही सिनेमे सांगता येतील. शिवाय श्रेयस काही दिवसांपूर्वी सनी देओलच्या भैयाजी सुपरहिट सिनेमात दिसला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

 

Loading...
You might also like