जन्माष्टमीला बुधादित्य ‘राज’योग, जाणून घ्या कोणत्या राशींना होणार महा’लाभ’ ?

पोलिसनामा ऑनलाईन – यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव खूप खास आहे. यावर्षी जन्माष्टमीला दोन शुभ योग आहेत. सर्वार्थ सिद्धि योग या व्यतिरिक्त बुध आणि सूर्य एकत्र झाल्यामुळे बुधादित्य राजयोग देखील बनत आहे. या शुभ मुहूर्तामध्ये केलेल्या कामात निश्चितच यश प्राप्त होते. दुसरे म्हणजे मंगळावर शनीची दृष्टी असल्याने अनेक राशींना फायदा होईल. आचार्य भूषण कौशल यांच्याकडून जाणून घेऊया की, जन्माष्टमीला बुधादित्य राजयोग कोणत्या राशीला फायदे देईल…

मेष
मेष राशीच्या लोकांना मालमत्ता किंवा संपत्तीच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. श्रीकृष्णाला पूजेच्या वेळी डाळिंब वाहण्यास विसरू नका.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना परदेशातून धन प्राप्ती होऊ शकते. वाहनाचा आनंद मिळू शकतो. वैवाहिक आनंद साध्य होईल. प्रेम संबंध सुधारतील. श्रीकृष्णाला अननस नक्की अर्पण करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनाही बुधादित्य योग संपत्तीचा लाभ देऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. आजारांपासून मुक्ती मिळेल. पैशाचा देखील फायदा होईल. श्रीकृष्णाला पूजेच्या वेळी पेर किंवा काकडी नक्की अर्पण करा.

कर्क
कर्क रास असणाऱ्या लोकांच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. नोकरीत प्रगती, पदोन्नती, इन्क्रिमेंटचा फायदा मिळू शकतो. श्री कृष्णाला मधाचा अभिषेक करून पेरू चढवा.

सिंह
जमीन व मालमत्तेच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. मालमत्तेत गुंतवणूकीचा फायदा होईल. कोणतेही लाल फळ अर्पण केल्याने तुम्हाला फायदा होईल. श्री कृष्णाला लाल सिंदूर आणि बत्ताशेही चढवू शकता.

कन्या
कन्या राशीच्या लोकांचे काम होईल. व्यवसाय चांगला चालेल. संपत्ती वाढेल. भागीदारीत व्यवसायात प्रगती होईल. श्रीकृष्णाला हिरवा आंबा चढवा. दुधामध्ये मध घालून श्रीकृष्णाला नक्की अर्पण करा.

तूळ
तूळ राशीच्या लोकांना संपत्ती आणि घरातील आनंद मिळू शकतो. नवीन वाहन खरेदी करण्याचाही योग बनत आहे. परदेशी जाण्याचाही आनंद मिळू शकतो. श्रीकृष्णाला कोणतीही मिठाई अर्पण करा आणि सोबतच एक केळीसुद्धा नक्की चढवा.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांची बिघडलेली कमी होतील. विवाहाचा योग बनेल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात येणाऱ्या अडचणीही दूर होऊ शकतात. शुभ मुहुर्तात देवाला खजुराचा भोग लावा. या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला गूळ चढवा.

धनु
धनु राशीत साडेसाती सुरू आहे. धनु राशीच्या लोकांना कर्जातून मुक्तता मिळू शकते. दीर्घकाळ चालणाऱ्या अडचणी संपू शकतात. कृष्णाला काळे तीळ पाण्यात टाकून अर्पित करा. तसेच काळी द्राक्षे देखील चढवा.

मकर
मकर राशीच्या लोकांचीही बिघडलेली कामे होतील. परदेश प्रवास केल्यास फायदा होऊ शकतो. मकर राशीत साडेसातीमुळे खूप त्रास होत आहे. देवाला पिवळा आंबा अर्पण केल्यास अडचणी दूर होतील. दह्यात मध घालून श्रीकृष्णाला अर्पण केल्यास अडचणी दूर होतील.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील. साडेसातीमुळे कुंभ राशीच्या लोकांनाही नोकरी व व्यवसायात अडचणी येत आहेत. या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला शुभ मुहुर्तात लाडू अर्पण करावे. तसेच पपई देखील अर्पण करा.

मीन
मीन राशीच्या लोकांना धन प्राप्ती होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य चांगले राहील. श्रीकृष्णाला आंब्याचा रस नक्की चढवा. तसेच देवाला केळीचा भोग लावा.