नायगाव येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज मंदिर दर्शननासाठी बंद

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यातील “क” दर्जा मिळालेले व जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिर देवस्थानने ३१ मार्चपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जागरण, सोमवती आमावस्या आदी कार्यक्रम देखील बंद राहणार आहेत. या काळात मंदिरातील महापूजा व आरती नियमित करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्च २०२० पासून लागू करून अधिसूचना जारी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर देवस्थानचे व्यवस्थापक राहुल कड यांनी ही माहिती दिली. भाविकांच्या आरोग्य संबंधी खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थानच्या वतीने ३१ मार्च पर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याची तारीख जाहिर केली. शासन निर्णय आल्यानंतरच भाविकांच्या देवदर्शनासाठी मंदिर व परिसर पुन्हा खुले केला जाईल असेही त्यांनी सांगितले.