श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन(राकेश बोरा) – लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कृ.उ.बा.समिती लासलगावचे माजी सभापती जयदत्त होळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी प्रसिध्द सिनेअभिनेत्री मिनाक्षी राठोड, नाशिक सिंहस्थ कमिटी मेंबर पंकज काळे, प्रसिध्द कवी प्रमोद अंबडकार, ना.म.को.बँकेचे संचालक महेंद्र बुरड, सुभाष नहार,सरस्वती विद्या प्रसारक मंडळ वाघदर्डीचे अध्यक्ष प्रकाश जैन, प्रसिध्द व्यापारी संजय धाडीवाल, राजेंद्र कांकरिया,पाचोरे ब्रु.मा.सरपंच बाळासाहेब उगलमुगले, ना.म.को.बँकेचे अध्यक्ष सोहनशेठ भंडारी, सामाजिक कार्यकर्ते फराह खान, शीतल साबद्रा, सुरेश कुमावत, अरुंधती पंकज काळे, तसेच स्टार न्यूजचे पत्रकार कल्पेश लचके, दिशा न्यूजचे पत्रकार रविना चांडोले, आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी संस्था व शाळेस मा.पंकज काळे व अरुंधती काळे यांच्या वतीने १०० खुर्च्या भेट देण्यात आल्या. पंकज काळे व अरुंधती काळे यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी आ. सुहास कांदे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या हातात विद्यार्थ्यांचे भविष्य आहे. यामुळे शिक्षकांनी मनापासून ज्ञानार्जनाचे कार्य करावे व विद्यार्थी घडवावे असे आवाहन केले. प्रसिध्द सिनेअभिनेत्री मिनाक्षी राठोड यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या ज्ञानदानाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्वेता घोडके दिवाणी न्यायाधीश झाल्याबद्दल कौतुक केले. प्रमोद अंबडकार यांनी व-हाडी भाषेतून विनोदी कविता सादर केल्या व विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळेस जयदत्त होळकर, सुभाष नहार, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, सुनील आब्बड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इ.५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून सर्वांची मने जिंकली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका, मुकाभिनय, समूह गायन, वैयक्तिक गायन, विविध वेशभूषा या कार्यक्रमांचा समावेश होता.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहनलाल बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमितजी जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषजी ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख कैलास भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे परीक्षण संगीता जगताप, अनुजा घोडके, गोरखनाथ आढांगळे यांनी केले. तर सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन, विद्यार्थी स्वराली देवरे, गायत्री पाटील, अभिषेक शेलार, मंगेश घीगे यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा –