Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकरांना कोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shridhar Patankar Court Relief | शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar Court Relief) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पाटणकरांशी संबंधित 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय कोर्टाकडून (CBI Court) मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या अहवालात सबळ पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

 

यापुर्वी कोर्टाने ऑक्टोबर 2020 मध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला होता. खरंतर या क्लोजर रिपोर्टला सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीचा (ED) विरोध आहे. ईडीने या प्रकरणात पुष्पक बुलियन या कंपनीच्या चंद्रकांत पटेल (Chandrakant Patel) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. मार्च महिन्यात ईडीने याच प्रकरणात पाटणकर यांच्या कंपनीच्या 6.5 कोटींच्या मालमत्तेवर कारवाई केली होती. त्यामध्ये पाटणकर यांना दिलासा मिळाला आहे.

 

मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली होती.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, पाटणकर यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA)
अंतर्गत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला होता.
याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आवाज उठवला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना याचा हिशोब द्यावा लागेल असे म्हटले होते.

 

Web Title :- Shridhar Patankar Court Relief | Former chief minister uddhav thackerays brother in law shridhar patankars court relief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा