Shridhar Patankar | मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का ! उध्दव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांची कोट्यावधी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shridhar Patankar | महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या ईडी अ‍ॅक्टिव्ह मोडवर असून सकाळपासून ईडीचे धाडसत्र (ED Raid) चालू होते त्यामुळे कोणत्या तरी ठिकाणी मोठी कारवाई होणार याचा अंदाज होता. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर (Shridhar Patankar) ईडीने (ED) कारवाई केल्याची माहिती समजत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे.

 

ठाण्यातील (Thane) नीलांबरी प्रकल्पातील (Neelambari Project) 11 प्लॅट जप्त करण्यात आले आहेत.
यामध्ये जवळपास 6.45 कोटींच्या मालमत्ता जप्त (Property Seal) केली आहे.
श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत.
यापूर्वी मनी लाँड्रिग प्रकरणी (Money Laundering Case) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, ईडीने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर कारवाई केल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

Web Title :-Shridhar Patankar | maharashtra cm uddhav thackeray brother in law shridhar patankar on ed radar ed attached his properties tweet by kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा