home page top 1

श्रीगोंद्यातील उद्योजक दौंड येथून ‘बेपत्‍ता’, पोलिस दप्‍तरी नोंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दूध व्यावसायिक सुभाष पांडुरंग शिंदे (वय 48) हे गायब झाले आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुभाष शिंदे यांचा दौंड तालुक्यातील शिरापूर येथे दूध डेअरी फार्म आहे. ते दौंड येथील पंचवटी अपार्टमेंट जनता कॉलनीत राहत होते. काल (दि. 18) संध्याकाळी 6.30 वाजता आंबेडकर चौक या ठिकाणावरून ते थोडे बाहेर जाऊन येतो, असे सांगून गेले. मात्र परत आलेच नाहीत. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. सुभाष शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी शिरापूरजवळ परिवार नावाने डेअरी सुरू केली होती. पण व्यवसायात अडचणी निर्माण झाल्याने ते बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

दूध व्यवसायिक सुभाष शिंदे हे बेपत्ता झाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यासह दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Visit – policenama.com 

 

Loading...
You might also like