काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का ! श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटेंसह 7 नगरसेवक भाजपात

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्यासह सात नगरसेवकांनी आज दुपारी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आज दुपारी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्यासह नगरसेवक मनोहर पोटे, राजू लोखंडे, सीमा गोरे, एस.पी कोथिंबीरे, संगीता मखरे, निसार बेपारी, सोनाली घोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये रात्री बैठक झाली. त्यानंतर आज दुपारी जाहीर प्रवेश करण्यात आला.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक होऊन अद्याप नऊ महिन्यांचा कालावधीही पूर्ण झालेला नाही, असे असतानाही नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com